१३ मार्चला वडखळ येथे भरणार महिलांचा भव्य मेळावा

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या शुभहस्ते होणार छानदार उद्घाटन


पेण, दि. - महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना, उपक्रम, धोरणं ही महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्यासाठीचा एक भाग म्हणून सर्वप्रथम त्यांना एकत्र आणणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांना बचत गटाचे महत्त्व, उद्योग- व्यवसायाची परिपूर्ण माहिती, अनुदानाच्या विविध योजना, कर्ज उपलब्धता, कच्च्या मालाची ठिकाणे, तयार वस्तुंना बाजारपेठ आदीबाबतची माहिती तज्ज्ञांकडून मिळावी, याकरिता येत्या शुक्रवार दि. १३ मार्च २०२० रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता वडखळ गावातील हनुमान मंदिर सभामंडपात आगरी महिलांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्यावतीने आणि ग्रुप ग्रामपंचायत वडखळ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यांत आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन रायगडच्या जिल्हाधिकारी सौ. निधी चौधरी यांच्या शुभहस्ते होणार आहे. या मेळाव्यात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदिप पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, लीड बँकेचे व्यवस्थापक अनत निबेकर, महिला व बालकल्याण अधिकारी, उद्योजिका विद्या म्हात्रे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रा. जि. प. च्या बांधकाम सभापती सौ. नीलिमा पाटील, पेणच्या नगराध्यक्षा सौ. प्रितम पाटील, पेण पं. स.च्या सभापती सौ.सरिता म्हात्रो, पनवेल महापालिकेच्या मा. महिला व बालकल्याण सभापती व नगरसेविका सौ.दर्शना भोईर, जि. प. सदस्य श्री. प्रभाकर (हरिओम) म्हात्रे, उपसभापती श्री.सुनील गायकर, प्रांताधिकारी सौ. प्रतिमा पुदळवाड, तहसीलदार सौ. अरुणा जाधव, पं. स. सदस्य श्री. सदस्य श्रा. प्रदीप म्हात्रे, अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सूर्यकांत पाटील, वडखळचे सरपंच श्री. राजेश मोकल, शिर्कीच्या सरपंच सौ. धनश्री पाटील, डोलवीच्या सरपंच,  सौ. वनिता म्हात्रे, बोरीच्या सरपंच सौ. प्रतिभा म्हात्रे, काराव- गडबच्या सरपंच सौ. अपर्णा  कोठेकर, मसदचे सरपंच श्री.  बळीराम भोईर, निगडेच्या सरपंच  सौ. कल्पना म्हात्रे हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात पेण तालुक्यांतील महिला बचतगट, महिला मंडळे, भजन मंडळे, नाच मंडळे तसेच इतर महिला मोठ्यासंख्येने सहभागी होणार आहेत. या सर्व महिला बचतगट, मंडळे यांचे संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये आगरी महिलांचे पारंपरिक नृत्य व धवलांचे सादरीकरण देखील होणार आहे. तरी आगरी समाजातील भगिणींनी या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थेचे पेण शाखा अध्यक्ष प्रा. सरेश पाटील व वडखळ ग्रप ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदीश म्हात्रे यांनी केले आहे.