"सबका विकास-आपका साथ"
"सबका साथ-सबका विकास" हे घोषवाक्य आहे पतप्रधान नरेंद्र मोदी याचे. या घोषवाक्याचा अर्थ आहे, सगळ्याची साथसोबत घेऊन जनमताच्या जोरावर पाशवी बहुमत मिळवायचे आणि देशातील १३५ कोटी जनतेवर अधिराज्य गाजवायचे. ही मोदीनीती अगदी चाणक्य नीतालाही भेदणारी आहे. यातून आपल्याला देशात कुणी विरोधकच असूनये. म्हणजे एकतफी कारभार हाकणे, आपल्याला जे सोयीचेवाटेल ते निर्णय घेणे सहज शक्य होईल. हा विचार डोक्यात घेऊन नरेद्र मोदीनी चक्क कांग्रेसमुक्त भारताचा नारा दिला. आणि त्याची सुरुवात एका-एका राज्यातून काँग्रेसला हद्दपार करण्यापासून झाली. काही राज्यात तर अनैतिक पध्दतीने काँग्रेस संपविण्यात आली. बहुमत नसतांना देखील राज्यपालांच्या मार्फत अधिकाराचा दुरुपयोग करुन सत्ता हस्तगत करण्याचे प्रकार घडले. कोटनिही काही राज्यात तेनिर्णय बदलले. तर कुठे काँग्रेसचे आमदार फोडून तेथील काँग्रेसची सत्ता उलथून टाकून तिथे आपली सत्ता स्थापित केली. मात्र हा उद्देश सफल करताना 'सबका साथ- सबका विकास' सफसेल मागे पडला. सुरुवातीला अगदी प्रादेशिक पक्षांची साथ चा साथघेणाऱ्या मोदींच्या डोक्यावर एकदाचे सत्तेचं मुकुट बसल्यावर त्यांना त्यांच्या मिळालेल्या साथ-सोबतीचा देखील विसर पडला. आणि एका-एकाची साथ मोदी सोडत गेले. कारण एकेकाळी संसदेत अवघे दोन खासदार असलेल्या संसद सभागृहात स्वबळावर एकट्या भाजपाची सत्ता आली. त्यामुळे त्यांना आभाळ ठेगणं झालं. मात्र असा उन्माद राजीव गांधींना काही झाला नव्हता. हे स्मरण करुन द्यावेसे वाटते. पण मोदींसह त्यांच्या सर्वच नेत्यांना मात्र सत्तेचा कैफ चढला. आणिकार्यकर्त्यांसह नेत्यांचेही मनोबळ इतके वाढले की,जो-तो नको ते बरळू लागला. अगदी भाजपाविरुध्द बोलणाऱ्याला सुनावले जावू लागले. त्यांना देशद्रोही ठरवले जाऊ लागले. यामुळे सर्वसामान्यांमध्ये एक प्रकारचे भय निर्माण झाले. पण प्रत्यक्षात मात्र २०१४ च्या निवडणुकी आधी मोदी यांनी जी आश्वासने दिली होती, त्याबाबत मात्र भाजपाचा एकही कार्यकर्ता ब्रदेखील काढायला तयार नव्हता. कारण ती सारी आश्वासने ही निव्वल दिवास्वप्नच होती. ती फसवी होती. हे पाच वर्षानंतर लोकांच्या पक्के ध्यानात आले आहे. निवडणुकीच्या काळात शाळा-कॉलेजमधून ज्या अविर्भावात त्यांनी धुवाधार भाषणं केली. मात्र त्यात कसलीही व्हीजन नावाची गोष्ट नव्हती. हैआता आता कळून आलं आहे. कारण सत्ता मिळाल्याने त्यांचंकाम संपलं आहे. म्हणूनच ही मंडळी आज बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, बिकट आर्थिक परिस्थिती, या कशावरही बोलायलातयार नाहीत. उलट त्यापासून लोकांचे लक्ष भलतीकडे वळविण्यासाठी मोदींचे सहकारी मंत्री नको ती वादग्रस्त विधाने करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु लागले आहेत. त्यात साधू, संत, बुवा, महाराज जे मंत्री बनले आहेत, ते सारेजण आघाडीवर राहिले आहेत. मग पक्षाचे प्रवक्ते तरी कसे बरं मागे राहतील. त्यांच्यामुळेच तर समाजातील एक वर्ग कमालीचा नाराज झाला. असहिष्णतेच्या वातावरणाने भयग्रस्त झालेल्यालोकांची चिंता करणारे समाज धुरीन, विचारवंत दुःखी झाले. त्यांनी पुरस्कार वापसीचा सपाटा लावून राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाच देशद्रोही ठरविले गेले. त्यामुळे नाराजीत अधिक भर पडली. आणि मुस्लिम, दलित, शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, तरुण हे सारेजण निराश झाले. मेकइन इंडियाच्या नावाने नवीन कारखाने उभे राहण्याऐवजी चालू असलेले हजारो कारखाने बंद पडले तर अगदी बऱ्यापैकी नफ्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पांना गाशा गुंडाळायला भाग पाडून ते बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट घातला जावू लागला आहे. मागील हाती घेतलेले प्रकल्प निधीअभावी रखडले असतांना नव्या प्रकल्पांच्या उभारणीची घोषणा करुन लोकांना केवळ खूश करण्याचा प्रयत्न आहे. पण हा केवळ दिखावपणा आहे. प्रत्यक्षात देशाची आर्थिक स्थिती मात्र अत्यंत बिकट आहे. हे लोकांना आता ज्ञात झाले आहे. जागतिक अर्थतज्ज्ञांनीच ही चिंता व्यक्त केली आहे. नोटबंदी, जीएसटीच्या झालेल्या घिसाडघाईमळे अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. त्याचे प्रतिबिंब आता आता उमट लागले आहे. विकासाचा फगा तेव्हाच फटल्याने 'सबका साथ-सबका विकास' हा नारा फसवा असल्याची भावना देशातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. तेथनच एका मागोमाग एक अशा अनेक राज्यात जनता विरोधकांच्या हाती सत्ता देऊ लागली आहे. इतकेच नव्हे तर देशाची राजधानी असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणकीत तेथील जनतेने अगदी प्रमाणिकपणे जनतेचा विकास करणाऱ्याला आपली साथ देण्याचा निर्णय घेतला. ही बाब निश्चितपणे भाजपाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे, एवढे मात्र खरे! इतर राज्यांप्रमाणेच दिल्लीतूनही केजरीवाल यांना सत्तेतून घालविण्यासाठी म्हणन केजरीवाल यांची टिंगल उडवन त्यांना अपमानित करण्याच्या घेतलेल्या भमिकेची शिक्षा दिल्लीवासीयांनी भाजप नेत्यांना देऊन सणसणीत चपराक लगावली आहे. कारण केजरीवाल हे उच्च शिक्षित असून उच्च पदस्थ अधिकारी पद भूषविलेले व्यक्ती आहेत. त्यांचे ज्ञान, अनुभव याची जाणीव दिल्लीतील सूज्ञ जनतेला आहे. त्यांनी ज्या पध्दतीने दिल्लीचा कारभार चालविला, यावर लोक पूर्ण संतुष्ट आहेत. म्हणूनच त्यांनी सबका विकास करणाऱ्या आप पक्षाला जनतेने ७० पैकी तब्बल ६२ जागांवर असे काही पाशवी बहुमत मिळवून दिले की, मोदी-शहानीतीला ती काही केल्या भेदता येऊ नये.