पेण, दि.१०- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पेण येथील दानशूर व्यक्तिमत्त्व कांतीलाल म्हात्रे यांनी कोरोना महामारीच्या संकटात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरिबांवर आलेली उपासमार लक्षात घेऊन चक्क स्वखर्चाने त्यांनी अन्नक्षेत्र उघडले केले आहे.
लॉकडाऊनमध्ये खरेदीसाठी सिथिल केलेल्य ११ ते २ या वेळेत त्यांनी पेणमधील लोकमान्य हौसिंग सोसायटीतील आपल्या घरी हे जेवण दिले जात आहे. पेणच्या आजूबाजूच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व सध्या रोजगारामुळे खाण्याची विवंचना असलेले शेकडो गरीब-गरजूं त्यांच्या अन्नदानाचा मोफत लाभ घेत आहेत. हा उपक्रम लॉकडाऊन संपेपर्यंत अखंड सुरु राहणार आहे. असेही त्यांनी स्पस्ट केले आहे.
नुकतीच त्यांनी चिपळूण येथील गोशाळेला चाऱ्यासाठी सव्वालाख रुपयांचे दान केले आहे. तर उन्हाळ्यात खारेपाटात निर्माण होणाऱ्या तीव्र पाणी टंचाईची गंभीर स्थिती पाहून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत असतात. धार्मिक कार्यासाठी देखील त्यांचा सदैव मोठा हातभार असतो. अशा विविध प्रकारच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मागील वर्षी त्यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोना संकटात कांतीलाल म्हात्रे यांनी घेतली उडी.