८० वर्षांचे शरद पवार करु पहाताहेत तरुणांशी मैत्री

     


       पेण, दि. १६- ८० वर्षाकडे झुकू लागलेले उतारवय. जडलेले आजारपण. पण प्रबळ इच्छाशक्ती. गाढ आत्मविश्वास. परिश्रम करण्याची प्रचंड तयारी 5 तयारा आणि लोकांना आपलेसे न करण्याचे कौशल्य. या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणात आपला कायम दबदबा ठेवला आहे. यामुळेच त्यांनी अलिकडेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकात भल्या-भल्याना अस्मान दाखविले. हे त्याचे कर्तत्व खऱ्या अर्थाने तरुणाईला देखील लाजवणारे होते. आणि तेही पक्षामधले अनेक बडे नेते एका मागोमाग एक पक्षाला सोडन सत्ताधारी पक्षात डेरे | दाखल होत होते. एकीकडे होत असलेली ही गलती तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी पक्षात धुमधडाक्यात होत असलेली मेगाभरती या | | पार्श्वभूमीवर पक्षातीलच इतरांनी अवसान गाळले. पण पवार मात्र किंचित्से देखील हिंमत हरले नाहीत. ते काडीमात्र खचून गेले नाहीत. उलट नव्या उमेदीने तरुणांना साद घालीत त्यांच्याच भरवशावर पवारांनी भर पावसात चिंब भिजत केलेला प्रचार तरुणाईलाही प्रभावित करुन गेला आणि त्यांनी केलेल्या उठावावर पवार यांनी निवडणुकीत बाजी मारली. तेव्हापासन त्यांचा तरुणाईतर पक्का भरवसा टिकन त्यांच्याशी मैत्री करु पहात आहेत. त्यासाठीच ते तरुणांशी संवाद साधण्यास निघाले आहेत. येत्या २३ फेब्रुवारी या २०२० रोजी ते मंजतील टाळा येथील भारतीय क्रीडा भवनमध्ये ५ हजार तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत. विरोधकांकडून त्यांना यासंदर्भातला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी स्वतःच 'सजग तरुणांशी संवाद कशासाठी-देशासाठी नव्या स्वराज्याच्या उभारणीसाठी' अशी टॅगलाईन देऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी ते राष्ट्रभक्ती, समाज-राष्ट्र-यांच्यापुढील नवी आव्हाने , बदलते जग, - तरुणांपुढील संधी अशा प्रमुख विषयांवर ते तरुणांशी बोलणार आहेत