सर्व जगभरात कोविद-१९ या विषाणूने घातलेल्या थैमानाने हाहाकार उडाला. क्षणार्धात देशोदेशीच्या सीमा सील झाल्या .आपत्काल स्थिती निर्माण झाल्याने जनतेला आपापल्या घरात कैद व्हावे लागले. सगळे जनजीवनच ठप्प झाले. अशा पार्श्वभूमीवर मात्र भारतात कोरोनाची ही लागण काहीशी धीम्या गतीने सुरु झाली असली तरी नंतरच्या टप्प्यात मात्र त्यानं काहीसे उग्र रूप धारण केले. महराष्ट्रात तर त्याचा सर्वाधिक प्रकोप वाढला. एकाट्या मुंबईत हजारोंच्या आसपास या विषाणूंनी लोकाना बाधित केले. तर राज्यभरात हा आकडा दीड हजाराच्या घरात पोहोचू लागलाय. अशा चिंताजनक परिस्थितीतही मुंबईच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्यत मात्र पनवेल तालुक्याचा उलवे, ओएनजीसी हा नवी मुंबईत समाविष्ट झालेला भाग सोडला तर पनवेल तालुक्याच्या अन्य भागासह जिल्ह्यात कोरोनाची लागण विशेष करून होऊ शकली नाही ही प्रचंड दिलासादायक बाब ठरली आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या संदर्भात अगदी सुरुवातीपासूनच उचललेली ठोस पावले ही जिल्हा कोरोनापासून संरक्षित ठेवण्याला मददगार ठरली . मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच या महामारीच्या साथीचा संभाव्य धोका ओळखून ८ मार्चलाच त्यानी जिल्ह्यांत जमावबंदी आदेश सक्तीने लागू केला. आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रशासनाला कामाला लावले. जेणेकरून लोकांनी ग्रुपने इकत्र येण्यावर नियंत्रण आणले. त्यासाठी विवाह सोहळ्यासह धार्मिक, सण , उत्सव, यात्रा आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, मेळावे आयोजित करण्यावर निर्बध आणले. ही खबरदारी घेतल्यानेच जिल्हा संसर्गापासून बचावला आहे.
२२ तारखेपासून आतापर्यंतच्या ९ तारखेला पनवेल तालुक्यातील १७ रूग्ण वगळता जिल्ह्यात विशेष पॉझेटीव्ह पेशंट आढळून आले नाहीत . त्यामुळे रायगडवाशीयांनी सुटकेचा स्वास टाकला आहे. सध्यातरी परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. लोकांनी असाच प्रतिसाद दिल्यास येत्या काळात कोरोनाला हरविने सहज शक्य होईल.