न्यायव्यवस्थेची स्वायत्तता अखंड टिकविणे गरजेचे

   


पेण, दि.२२- न्यायव्यवस्थेतील निकाल फिरविण्यासाठी लाच देणाऱ्यांची एक लॉबी सक्रीय आहे. या प्रकारामुळे निःपक्षपाती न्याय मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. याचा परिणाम नकळत न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर होऊ लागला आहे. ही सुदृढ आणि निकोप लोकशाही मूल्याना बाधा पोहोचविणारी कीड उखडून टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी ही लॉबीच तोडून  टाकली पाहिजे. असे परखड मत माजी सरन्यायाधीश आणि व राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांनी व्यक्त केले आहे.


          एखाद्या प्रकरणात आपल्या मनाप्रमाणे घडत नसेल किंवा बाजूने निकाल लागत नसेल तर लाच देऊन न्यायालयातील खटला थांबविण्यास भाग पाडले जाते. असा खुलासा करताना शक्य असणाऱ्या प्रत्येक मार्गाने न्यायाधीशावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लाच देऊन न्यायव्यवस्थेला बदनाम करणारी ही लॉबीच तोडण्याची आवश्यकता आहे. असेही ते म्हणाले. श्री. गोगोई यांच्या राज्यसभा नियुक्तीला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोध केला आहे या पार्शमीतर शाली प्रतिक्रीया देतांना त्यांनी आपली  ही नियक्ती म्हणजे सरकारने  आपल्याला दिलेली भेट नाही. हेही त्यांनी स्पष्ट केले. या त्यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चाना मात्र आता कमालीचे उधाण येणार आहे.