पेण तालुक्यांतील सर्वात मोठी वाशीची यात्राही यंदा भरणार नाही


पेण. दि.२२- एप्रिल महिना उजाडला की रायगड जिल्ह्यांतील नागरिकांना यात्रांचे वेध लागतात. देवतांच्या उत्सवांची चालत आलेली अखंड परंपरा येथे आजही चाल आहे. दरवर्षी अनेक गावच्या यात्रांप्रमाणेच पेण तालुक्यांतील वाशी येथील जगदंबा मातेची यात्रा ही सर्वात मोठी असते. या यात्रेला संपूर्ण तालुक्यांतीलच नव्हे तर जिल्ह्यांतून आणि जिल्ह्या बाहेरुनही लोकं सहभागी होत असतात. त्यामुळे ही यात्रा प्रचंड प्रमाणात भरत असते जागृत देवस्थान असलेल्या जगदंबा मातेचा परि महिमा अफाट असल्याने येथे नवरात्रौत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. तर दर मंगळवारी जगदंबेच्या दर्शनाला भाविक भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळते.  परंतु नुकत्याच जगभरात उद्भवलेल्या कोरोना विषाणंच्या पार्श्वभमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आल्याने व राज्यांतील अनेक देवस्थानांनी आधीच मंदिर, मशीद, गुरुव्दार, चर्च सारे बंद केले असल्याने जगदंबा देवी मंदिर ट्रस्टने देखील यावर्षी यात्रा न भरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर वाशी आणि ओढांगी गावातून निघणारी वरसू आईची पालखी देखील यावर्षी परि स र वो पोलादी असा वालातर एक फेरी मारुन समाप्त होईल. असे टस्टतर्फे सांगण्यात आले. तसेच कोणताही लेपा, देवकाठ्या, मिठाईची दुकाने, आकाश पाळणे मंदिर परिसरात यायला ट्रस्टीनी मनाई केली आहे.