ओबीसींच्या जनगणनेबाबत शिष्टमंडळ केंद्राला भेटणार! -उपमुख्यमंत्री अजित पवार


 पेण दि.१- ओबीसींची स्वतंत्र जनगणना हावी ही मागणी घेऊन या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विरोधी पक्षनेत्यांसह राज्याचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे त्यांना यांनी सरकारकडे यासंदर्भातला जबाब विचारला होता. याबाबत अध्यक्षांनीच अधिवेशनात एकमताने ठराव संमत केला होता. त्याचे पुढे काय झाले? असा त्यांचा मर्यादा सवाल होता. श्री. ठाकरे यांच्याच बोलणे मुद्दयाला समर्थन देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हा अहवाल योग्य पध्दतीने सादर झाला होता काय? असा सवाल उपस्थित केला. या चर्चेत सहभागी होत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवत ही मागणी एका राज्याची नसून ती संपूर्ण देशाची असल्याचे निक्षून सांगितले. देशात एकूण ५४ टक्के त्यासाठी ओबीसी असतांना त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण होत आहेत का? याचा एकदा आढावा घ्यावा. म्हणजे त्यांना आरक्षणाचा वाटा किती द्यावा लागेल हे कळेल. असे सुचवत (वा त्यांनी ओबीसींबाबतचा आपला कैवार दाखवून दिला. तर विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला काही मर्यादा आहेत. असे सांगत हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने बोलणे क्रमप्राप्त असल्याचे म्हटले. अलिकडच्या काळात ओबीसींच्या आरक्षणाची अक्षरशः शकले केली असल्याचा घणाघाती आरोप करत या धोरणावरच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सन २०२१ च्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर ओबीसींची स्वतंत्र गनणा केली| जावी. अशी मागणी ओबीसींच्या नेत्यांनी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी वारंवार सरकारकडे अर्ज विनंत्या, भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला आहे. तर विधिमंडळामध्ये देखील ओबीसी नेत्यांनी हा प्रश्न उचलन धरला आहे.