आता इंग्रजी शळांमध्येही मराठी सक्तीची


पेण, दि.- पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण आणि इंग्रजीचे वाढते प्रस्थ. यामुळे मराठी भाषेची प्रचंड गळचेपी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर मातृभाषेचे संरक्षण व्हावे. तिला अभिजात दर्जा मिळावा, तिचे संवर्धन व्हावे, अशी मागणी साहित्यिकांकडून वारंवार ऊठू लागली. दरम्यान सुदैवाने मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी जन्माला आलेल्या शिवसेनेचे राज्यात सरकार स्थापन झाले. आणि एकदाचे मराठी भाषेलाच सोनियाचे दिनू आले. नुकतीच महाविकास आघाडी सरकारने आयबी, सीबीएसई आणि आयसीएसई तसेच इतर सर्वच इग्रजा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य केला आहे. . या सक्तीच्या निर्णयाची शाळांनी टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करावी परंतु यामध्ये कोणतीही कुचराई सहन केली जाणार नाही. असे अडमुठे धोरण अवलंबिणाऱ्या शाळांवर आधी दंड ठोठावला जाईल. आणि नंतरही त्यांच्या धोरणात बदल दिसून आला नाही तर अशा शाळांची थेट शिक्षण विभागाकडून मान्यताच रद्द करण्यात येईल. असा निणय घऊन वाधमडळाच्या दोन्ही सभागृहात त्याला मान्यता घेण्यात आली. या निर्णयाचे मराठी माणसांनी जोरदार स्वागत केले. तर जे विद्यार्थी आपल्या पालकांच्या बदलीमुळे अन्य राज्यात जातील त्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळांतील विद्यार्थी मात्र धास्तावले आहेत.