मुरुड, दि.१६- मुरुड तालक्यांतील शेतजमिनी ह्या खारभूमी लाभक्षेत्रांतर्गत असल्याबाबत करण्यात आलेल्या चुकीच्या नोंदी तातडीने रद्द करण्यात याव्यात. असे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ७/१२ वरील अशा नोंदी रद्द झाल्यास पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल. असा आशावाद व्यक्त कारतांना त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वनेतर वापरास बंदी आहे. अशा शेतकऱ्यांच्या जमीन मिळकती देखील विक्रीस शासनाची परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन पालक- मंत्र्यांनी याप्रसंगी दिले. याचवेळी अनेक दिवस प्रलंबित असलेल्या मुरुड-जंजिरा येथील स्थानिक गाईडचे काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना अधिकृत मान्यता देण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या रोहिदास महाराज आहेत. यावेळी विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातबारावरील चुकीच्या नोंदी तातडीने रद्द करा !-आदिती तटकरे