प्लास्टरच्या मूर्तिवर बंदी घालण्याचे न्यायालयाचे आदेश

पेण, दि.१- गणपती आणि दुर्गा माहोत्सवासाठी तयार होत असलेल्या सर्व देव- देवतांच्या मूर्ती ह्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या बनविल्या जात असल्याने त्याचे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे अशा मुर्त्यांवर राज्य सरकारने कायमस्वरुपी बंदी घालावी. असे सक्त आदेश संबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. या निकालाचा जबरदस्त फटका तसा पेण तालुक्यांतील गणेश मूर्तीकारांना बसणार आहे. कारण आतापर्यंत लहान-मोठ्याच नव्हे तर अवाढव्य अशा लाखोंच्या संख्येने मूर्ती तयार देखील झाल्या आहेत. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी झालीच तर यावर्षी तरी गणपती कारखानदार जमिनदोस्त होतील एवढे मात्र खरे! खामगाव येथील ओमप्रकाश गुप्ता यांनी विसर्जन विल्हेवाट लागत नसल्याबाबत केलेल्या पीओपी मूर्त्यांची योग्य पाच वर्षापूर्वी ही तक्रार केली होती. त्यावर निकाल देतांना न्यायालयाने राज्य सरकारला पर्यावरणा संदर्भात संवेदनशील असायला हवे. असे खडसावत जलाशये ही प्रदूषित होणार शहरी वा ग्रामीण भागातील नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे असे म्हटले आहे . पीओपीच्या प्रदूषणामुळे जलाशयातील जीवचक्रावर विपरित परिणाम घडत आहे. अशी आदेश दिला आहे. चिंती व्यक्त करत न्यायालयाने हाआदेश दिला आहे.