प्रा. विनायक पवार यांना साहित्य परस्कार जाहीर


पेण, दि.१६- सध्याचे आघाडीचे चित्रपट गीतकार- कवी प्रा. विनायक पवार यांच्या 'नामुष्कीचे पिढीजात वर्तमान' या काव्यसंग्रहाला यंदाचा लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ही घोषणा संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव यांनी नुकतीच केली आहे. नाशिकच्या ज्ञानगंगा बहुद्देशीय शैक्षणिक संस्थेतर्फे हे साहित्य पुरस्कार दरवर्षी दिले जात आहेत. या पुरस्काराचे वितरण येत्या २१ फेब्रुवारी २०२० रोजी दिंडोरी तालुक्यांतील पांडाणे येथे आयोजित एका छानदार समारभात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी याच्याहस्ते करण्यात येणार आहे. पाच हजार रुपये पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह. प्रशस्तीपत्र, राख, . शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. काव्य संग्रहाचे परीक्षण डॉ. कैलास सलादे यांनी केले आहे. विनायक पवार हे सध्या पेण येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राद्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत ख्वाडा, बबन, छत्रपती शासन या मराठी चित्रपटांचे पुरस्काराचे गीतलेखन केले आहे. २० वर्षापासन ते साहित्य क्षेत्राच्या चळवळीत कार्यरत आहेत. त्यांची एक भाषांतरीत मराठी कविता 'माणसं पेरायला लागू' ही दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ झाली आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक कार्यक्रमात त्यांनी प्रमुख पाहुणेम्हणून सहभाग घेतला आहे. आकाशवाणीवर, विविध वाहिन्यांवर त्यांच्या कविता सादर झाल्या आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.