कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने काँग्रेस पक्षात आली नवी जान
पेण, दि.१५- केंद्रात आणि राज्यात देखील सपाटून मार खाल्लेल्या, त्यातच स्थानिक नेतृत्वांनी पक्षाची साथ सोडून दिल्याने पेण विधानसभा मतदारसंघातील सर्वच मोठ्या नेत्यांनी देखील घर फिरले की घराचे वासे फिरतात त्याप्रमाणे पाठ फिरविली असतांना जणू येथील काँग्रेस जमीनदोस्त झाली असेच चित्र निर्माण झाले. परंतु निवडणुका होऊन तिमाहीच उलटली आणि येथील राजकीय चित्रही एकदमच पालटून गेले. ह्याची अनुभूती नुकत्याच बोलावण्यात आलेल्या पेण शहर काँग्रेस पक्षाच्या बैठकीला मिळालेल्या उत्स्फर्त प्रतिसादाने आली आहे. नव्या दमाचे शहर अध्यक्ष प्रवीण शंकर पाटील यांनी ही बैठक महात्मा गांधी सभागृहात बोलावली होती. यावेळी शहरातील शेकडो कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वात उपस्थित होते. मात्र याआधी मोठ्या नेत्यांनी बोलाविलेल्या तालुक्याच्या मिटिंगला देखील इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली नव्हती. हा प्रतिसाद पाहून आतापर्यंत तटस्थ असलेले कार्यकर्ते अचंबित होऊन पक्षामध्ये सामील होऊ लागले आहेत. हा प्रवाह असाच सुरु राहिला तर येत्या काळात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल. आणि विरोधकांना धक्का देईल का ईल यात शंका नाही. सध्या काँग्रेस पक्ष राज्यात सत्ताधारी झाला आहे. शिवाय त्याला राष्ट्रवादी, शेकाप आणि शिवसेना या पक्षांचा पाठबळ मिळालेला असल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल चांगलेच बलावले आहे. आपली कामं करुन घेण्यासाठी, आपल्याला पद मिळावे म्हणन इतर पक्षांतील मिला तर यांतील कार्यकर्त्यांचा ओघ सत्ताधारी समजून काँग्रेस पक्षाकडे वळला आहे. हे वातावरण पक्षवाढीच्या दृष्टीने अत्यंत पूरक झाले आहे हे मात्र खरे! यावेळी तालुकाध्यक्ष अशोक मोकल, जिल्हा सरचिटणीस हिराजी पाटील, निलेश म्हात्रे, ना. ह. सुर्वेगुरुजी, नाट्य कला कलाकार सुहास तेरवाडकर, माजी नगरसेवक शामर पूजा पाटील, शेखर तांबोला, डॉ. शहासने, किरण देव, बंड्याशेठ काळण, अमित कुंभार, निझार अली, सूर्यकांत पाटील, अॅड. सिध्देश म्हात्रे, निलकंठ पवार आदीजण उपस्थित होते.