रायगड बनू पहातोय मद्यपिंचा अडा?

         


        अलिबाग, दि. १६- जगाच्या नकाशावर पर्यटनासाठी सर्वाधिक पसंतीस ठरलेला रायगड जिल्हा आता मद्यपिंसाठी पर्वणीचा ठिकाण तर ठरु लागला नाही ना! अशी शंकेची पाळ सहज चकचुकू लागली आहे. पर्यटनाचा आनंद हा जितका विलोभनीय निसर्ग सौंदर्य, रमणीय ठिकाणे, पीन तिहासिक स्थळे विशेष न्याहाळताना मिळतो आहे. त्यापेक्षा तळीरामांसाठी तो मद्यसेवन करण्यात मिळत असल्याचे एका आकडेवाडीतून दिसून आले आहे. रायगडची ओळख अशा पध्दतीने होणे ही खरी तर लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. पण हेच वास्तव समोर आले आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापेक्षा सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये तब्बल १८ लाख ५४ हजार ५८९ बल्क लीटर दारुची अधिक विक्री म्हणजेच सरासरी १० टक्के इतकी वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतेच जाहीर केले आहे. यामध्ये विविध प्रकारच्या दारुचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे ही आकडेवारी अधिकृत दुकानातून विक्री झालेल्या दारुची असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे. साहजिकच त्यामुळे त्यांच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. सरुवातीच्या आर्थिक वर्षातल्या नऊ महिन्यातच मद्यविक्रीच्या दुकानांमधून तब्बल २ कोटी ४२ लाख २८ हजार ५८६ बल्क लीटर दारुची विक्री झाली असल्याने अद्याप तीन महिने बाकी असल्याने हा आकडा बराच मोठा वाढणार आहे. तळीरामांच्या मद्य प्राशनात देशी, विदेशी, बिअर आणि वाईन अशा प्रकारांचा | समावेश आहे. तरी तळीरामांनी सर्वात अधिक पसंती ही बिअर आणि त्या खालोखाल वाईनला दिल्याचे समोर आले आह. यावाढत्या मद्यविक्राच्या प्रकारामुळरायगड जिल्ह्यांतील तरुणाई | व्यसनाधिनतेच्या मार्गाकडे वळण्याची भीती निर्माण झाली | आहे. कारण गजबजलेले समुद्र किनारे आणि त्यांची वाईनसंस्कृती स्थानिकांवर वाईट परिणाम करणारी आणि त्यातून नव समाज बिघडविण्याचा मोठा धोका हा चिंता वाढविणारा आहे.


                                                 कशी झाली मद्यविक्रीची वाढ ती पाहू या